You are currently viewing परूळे येथील काथ्याव्यवसाय प्रशिक्षण वर्गाची सांगता

परूळे येथील काथ्याव्यवसाय प्रशिक्षण वर्गाची सांगता

परूळे :

परूळेबाजार ग्रामपंचायत व सिंधुदुर्ग लोकशिक्षण संस्था वेंगुले यांच्या संयुक्त विद्यमाने परुळेबाजार ग्राम. पं. कार्यक्षेत्रातील महिलांकरिता दोन महिने कालावधीचे काथ्या प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. यामध्ये महीलांना प्रशिक्षक सौ रुची राउल यांनी काथ्यापासुन विविध प्रकारची पायपुसणी, शोभीवंत वस्तू व दोरी बनविणे याचे प्रशिक्षण दिले. यावेळी दोन सत्रात एकूण 80 महीलांनी याचा लाभ घेतला. यावेळी प्रशिक्षणाची सांगता होताना प्रशिक्षक रुची राऊळ यांचा प्रशिक्षणार्थी महीलांनी भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

या प्रशिक्षण सांगता कार्यक्रमात माजी सरपंच प्राजक्ता चिपकर, प्रणिती आंबडपालकर, प्रशिक्षक रुची राऊळ, स्नेहा पेडणेकर, प्रणिता तांडेल किर्ती मेस्त्री मंजूषा चव्हाण, नताशा चिपकर, सानिका परुळेकर तसेच प्रशिक्षणार्थी माहीला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 1 =