You are currently viewing सिंधुदुर्गचा राष्ट्रीय नेमबाजीत डंका

सिंधुदुर्गचा राष्ट्रीय नेमबाजीत डंका

सावंतवाडीतील शैलेश विष्णू सावंत व श्रीया अतुल  नाखरे या खेळाडूंची निवड

सावंतवाडी

नुकत्याच मुंबई येथे घेण्यात आलेल्या ९ व्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पिअनशिपमध्ये सिंधुदुर्गच्या नेमबाजांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली.स्पर्धे मध्ये मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दिवदमण या राज्या मधून स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा १० मीटर एअर पिस्तूल ,२५ मीटर .२२ व ५० मीटर पिस्तूल प्रकारात घेण्यात आली. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात खुल्या गटामध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे शैलेश विष्णू सावंत (सावंतवाडी)यांनी ४०० पैकी ३७६ गुणांची नोंद केली व डिसेम्बरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय नेमबाज अतुल नाखरे यांची कन्या श्रीया नाखरे (मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी ) हिने ४०० पैकी ३४३ गुण मिळवून युथ गटात चांगली कामगिरी करून राष्ट्रीय स्पर्धेत निवड होण्यात यशस्वी झाली.

नाखरे हि गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करत असून दोन्ही खेळाडू हे उपरकर शूटिंग रेंजवर नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण लाभले तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.निवड झालेल्या दोन्ही खेळाडूंचे सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील राष्टीय स्पर्धे साठी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा