You are currently viewing भाजते मुक्ताई मांडे

भाजते मुक्ताई मांडे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद ढवळीकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*भाजते मुक्ताई मांडे*

विसोबा पाहे कौतुक घडे
भाजते मुक्ताई मांडे ll

निवृत्ती नाथे जी वदिली
ऐकून इच्छा मुग्ध जाहली
गहिवरली अंतरी मुक्ताई
ज्ञानेशानी मनी जाणली
योग क्रियेने जठराग्नीस मग प्रकटविले थोडे
भाजते मुक्ताई मांडे….

जनरोषाला कारण ठरले
दिव्यत्वाने दिव्य सोसले
संन्याशाची पोरे म्हणुनी
अधिकारांना वंचित झाले
पारमार्थिक अधिकारांचे त्यांच्या दर्शन तेंव्हा घडे
भाजते मुक्ताई मांडे…

वैराग्याचे लेणे ल्याले
विरक्ततेचे व्रत आचरिले
ज्ञान तपस्या योग साधने
अध्यात्माचे अमृत प्याले
भक्ती हाच संसार जयांचा काय उणे त्या पडे
भाजते मुक्ताई मांडे….

अरविंद
12/4/21

Advertisement

*⚛️प्रवेश मार्गदर्शन सुरू⚛️*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*_🥳१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…👩‍💻_*

*🛑उपलब्ध शिक्षणक्रम:-*
🔸बी. ए.
🔹बी. कॉम.
🔸एम. कॉम.
🔹एम. बी. ए.
🔸रूग्ण सहायक
🔹एम.ए. (अर्थशास्त्र)
🔸एम.ए. (लोक प्रशासन)
🔹एम.ए. (इंग्लिश)
🔸एम.ए. (हिंदी)

*# सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र #*

*📜प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-👇*

*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

*📲मोबा. 8605992334*

*Web link*

प्रतिक्रिया व्यक्त करा