You are currently viewing आई

आई

आयुष्याच्या संध्याकाळी वासराने गाय व्हावे
आपणच आपल्या आईची तेंव्हा माय व्हावे…

झिजलेल्या चंदनाला नित्य सर्वकाळ पुजावे
कष्ट सोसले जीवनात सदैव स्मरणात ठेवावे
थकलेल्या जीवास आधार त्यांचे पाय व्हावे
आपणच आपल्या आईची तेंव्हा माय व्हावे…

आगळा मूर्तिकार घडवी पाषाणा सगुण साकार
नाजूक इवल्याशा हातांना देते भक्कम आधार
राबलेल्या तळहाता साठी दुधावरची साय व्हावे
आपणच आपल्या आईची तेंव्हा माय व्हावे…

तुला पोटभर वाढून तुपाशी ती राहिली उपाशी
तिच्या मुळेच गगनात वेड्या आज तू विहरशी
झिजलेल्या दातांनी अाता पोटभर खाय म्हणावे
आपणच आपल्या आईची तेंव्हा माय व्हावे….

विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 − eleven =