You are currently viewing मोती तलावातील मासे पकडणाऱ्यांना परप्रांतीयांना आवरा – राजू बेग

मोती तलावातील मासे पकडणाऱ्यांना परप्रांतीयांना आवरा – राजू बेग

सावंतवाडी पालिकेच्या मुख्याधिका-यांकडे केली मागणी

सावंतवाडी

येथील मोती तलावात पालिका प्रशासनाकडून सोडण्यात आलेले मासे काही परप्रांतीय लोक गळाच्या सहाय्याने काढत आहेत. त्यामुळे याची पालिका प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक राजू बेग यांनी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे केली आहे. दरम्यान रात्रीच्या वेळी ही मासेमारी केली जात आहे. त्यामुळे मासे पकडणे गुन्हा आहे, असे फलक तलावाच्या ठिकाणी लावण्यात यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =