You are currently viewing प्रशासनाला जाग आणण्यासाठी कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली करणार रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन..

प्रशासनाला जाग आणण्यासाठी कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली करणार रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन..

पालकमंत्री ऊदय सामंत यांचे वेधणार लक्ष!

कुडाळ
प्रशासनाला जाग आणण्यासाठी कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली हे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २९ ऑक्टोबर रोजी घंटा नाद आंदोलन करणार आहेत. देवानंद कृष्णा ढेकळे  -मुख्याधिकारी यांनी पदाचा गैरवापर करुन ३ अपत्य असल्याची माहिती शासनापासून दडवून फसणूक केल्याप्रकरणी त्यांना निलंबीत करुन त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याची विनंती अमित सामंत अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांनी दि. २३/०२/२०२० रोजीच्या पत्रान्वये मा. राज्यमंत्री नगरविकास यांना केलेली होती.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने मा. राज्यमंत्री नगरविकास यांनी सदर गंभीर प्रकरणाची त्वरीत चौकशी करण्यात यावी असे निर्देश दिले होते. तसेच सदर प्रकरणी मा. मंत्री नगरविकास यांनी चौकशी करुन अहवाल सादर करावा असे निर्देश दिले होते. अमित सामंत यांनी सादर केलेली तक्रार आणि या अनुशंगाने मा. नगरविकास व मा. राज्यमंत्री नगरविकास यांनी दिलेले निर्देश विचारात घेता या प्रकरणी चौकशी करुन अहवाल अभिप्रायासह सादर करावा असे निर्देश मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना दि. २६/०८/२०२० रोजी दिलेले होते. या प्रकरणाला तब्बल दिड महिना उलटूनही कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचे माझ्या निर्देशनात आलेले आहे,असे तेली यांनी म्हटले आहे.
शासनाच्या मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांना वाचविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. येत्या आठ दिवसा या प्रकरणी जिल्हा प्रशासन रत्नागिरी यांनी अहवाल सादर न केल्यास दि. २९ ऑक्टोबर २०२० रोजी रत्नागिरी जिल्ह्याधिकारी कार्यालया समोर घंटानाद आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येईल. तसेच सिंधुदुर्ग चे पालकमंत्री ऊदय सामंत यांचेही  वेधणार लक्ष असल्याचे श्री. तेली म्हणाले. नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. याबाबतची अधिक माहिती ची प्रत नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी प्रत : मा. जिल्हा पोलिस अधिक्षक, रत्नागिरी जिल्हा, रत्नागिरी. प्रत : मा. तहसिलदार साहेब, तहसिल कार्यालय रत्नागिरी यांना दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 12 =