ब्रह्मचारिणी मंत्र
या देवी सर्व भुते्षू माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता दधाना कर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू ॐ देवी ब्रह्मचारिणी नमः
भगवती दुर्गामातेच्या ज्या नऊ शक्ती आहेत त्या मध्ये ब्रह्मचरिणी हे दुसरे रूपं आहे. येथे ब्रह्म याचा अर्थ तापाश्चर्यl असा होतो. ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी. या दुर्गेचे स्वरूप पूर्णतः ज्योर्तिमय आणि अत्यंत भव्य असे आहे. हिच्या उजव्या हातात जपमाळ असून डाव्या हातात कमंडलू आहे. भगवती देवीचे हे दुसरे रूपं भक्तांना आणि सिद्धाना अनंत पुण्य देणारे आहे. हिची उपासना केल्याने मनुष्यात तप, त्याग, वैराग्य, सदाचार व संयम या दैवी गुणांची वृद्धी होते. नवरात्रात दुसऱ्या दिवशी हिचीच उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन स्वाधीष्ठान चक्रात अवस्थित केलेला योगी या दुर्गेची कृपा आणि भक्ती प्राप्त करतो. या देवीला ज्ञान, तपस्या आणि वैराग्याची देवी मानली जाते. कठोर साधना आणि ब्रह्मl त लिन राहते म्हणून या देवीला ब्रह्मचारिणी म्हंटले जाते. विध्यार्थ्यानी आणि तपास्विनी हिची पूजा केल्यास ती फालदायी ठरते.
आजचा रंग.. लाल
आजची माळ.. बेल, धोत्रा, रुई
कल्पना तेंडुलकर
ओरोस