You are currently viewing नशीबवान साडी….
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

नशीबवान साडी….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*…. नशीबवान साडी….*

आज नवरात्र प्रारंभ म्हणुन तिने साड्यांनी भरलेलं कपाट उघडलं… जवळपास सगळे रंग होते.. अगदी दीढ हजारापासुन ५० हजारापर्यत सगळ्या रेंजच्या साड्या होत्या.. तिने सगळ्या साड्यांवर नजर फिरवली .. साड्यावर हात फिरवत असताना तिचा हात एका साडीपाशी थबकला ती साडी म्हणजे पांढऱ्या रंगाची साडी.. जी साडी तिने एकदाच नेसली होती .. त्यानंतर अनेकदा तिने ती उलगडून पाहिली आणि तशीच हॅंगर ला ठेवुन दिली.. असं काय होतं त्या साडीत.. त्या साडीत होत्या तिच्या आठवणी..
साधारणपणे ३ वर्षापूर्वी ती हीच पांढरी साडी नेसुन एका गृप पार्टीला गेली होती.. तिथे तिचा लग्नाआधीचा मित्र भेटला होता.. काही कारणाने त्यांचं लग्न नव्हतं होवु शकलं पण त्याचं असं अचानक पार्टीत भेटणं आणि त्याची तिच्याकडे पहाण्याची नजर तिला पुन्हा वीशीत घेउन गेली .. त्याने कसंबसं स्वतःला सावरत जेवायला घेतलं , जेवुन हात धुवायला वॉशबेसिनपाशी गेली तिथे तोही हात धुवत होता.. हात धुतल्यावर त्याने त्याच पांढऱ्या साडीला त्याचे हात पुसले होते.. still I like yu म्हणत निघुन गेला होता.. एखाद्या बाळाने आईच्या पदराला तोंड पुसावं ना तसा फील तिला आला पण त्याचा तिच्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन हा आजही तोच होता.. पांढऱ्या शुभ्र साडीवर उमटलेले त्याच्या हाताचे ठसे वाळले तरीही तिला दिसत होते आणि त्यातील भावना त्याही दिसत होत्या.. नवरात्री निमित्ताने आज ती हीच साडी नेसली होती… पांढरी शुभ्र त्यावर पांढरं ब्लाउज आणि मोत्याचा सेट.. अशा कितीतरी जणी आज आपली दुख लपवुन पांढऱ्या रंगासारख्या चमकत असतील.. पांढरा रंग कशातही सामावला तरीही तो त्याचं अस्तित्व टिकवुन ठेवतो आपणही सख्यांनो हेच करायचय.. स्वतः दुसऱ्यासाठी जगत असताना आपलं अस्तित्व जपायचय कारण एक नारी जगावर भारी…

सोनल गोडबोले
लेखिका,अभिनेत्री

Advertisement

 

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

प्रतिक्रिया व्यक्त करा