आत्मियता आणि जिव्हाळा याचा संगम: आयुक्त श्री अरुणकुमार डोंगरे
अमरावती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा एका सनदी अधिकाऱ्याच्या मुलीच्या विवाहाला येतात लोकांमध्ये चर्चा करतात आणि जेवण करून जातात. साधारणपणे दीड तास वेळ देतात. ही गोष्ट अनन्यसाधारण आहे. आणि हीच गोष्ट आपल्या नागरी हक्क आयोगाचे आयुक्त श्री अरुणकुमार डोंगरे यांच्या बाबतीत घडली आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंगरे साहेबांच्या मुलीच्या लग्नाला तब्बल दीड दिला. त्यामुळे श्री अरुण कुमार डोंगरे व मुख्यमंत्री यांचे किती जवळचे ऋणानुबंध आहेत ते लक्षात येते. कर्तव्य तत्परता शिस्तबद्धता व कालबद्ध नियोजन यामुळे श्री अरुणकुमार डोंगरे आज प्रशासनामध्ये नागरी हक्क आयोगाचे आयुक्त म्हणून कार्य करीत आहेत.
श्री अरुणकुमार डोंगरे यांचा बराचसा कालावधी हा अमरावती विभागामध्ये गेलेला आहे. पुढे सोलापूरला मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेडला जिल्हाधिकारी असा टप्पा गाठत ते म्हाडाचे मुख्य अधिकारी म्हणून मुंबईला गेले. ते जरी मुंबईला गेले तरी त्यांनी आपला वैदर्भीय बाणा सोडला नाही. येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत व त्यांच्या कामासाठी त्यांनी केलेली मदत ही सदैव कायम होती आणि आहे.
श्री अरुणकुमार डोंगरे यांचा माझा परिचय श्री ह. रा. कुलकर्णी हे अमरावतीला आयुक्त असतांना झाला. ते वर्ष डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. त्यानिमित्त आम्ही युग निर्माता या नाटकाची निर्मिती केली होती. श्री ह.रा. कुलकर्णी यांची समर्थ साथ आम्हाला होती. त्यामुळे अमरावती विभागात ठिकठिकाणी त्यांच्या पुढाकाराने आमचे प्रयोग झाले. पण पहिला प्रयोग घेतला तो श्री अरुणकुमार डोंगरे यांनी .दारव्हा येथे तेव्हा ते उपविभागीय अधिकारी होते. कलाकारांचे योग्य ते मानसन्मान योग्य ते मानधन हे सगळे सोपस्कार त्यांनी अतिशय आत्मियतेने व जिव्हाळ्याने पार पाडले.
साहेब सोलापूरला गेल्यानंतर माझ्या मी आय ए एस अधिकारी होणारच या कार्यक्रमाचे सोलापूरला आयोजन करण्यात आले होते. मुक्काम अर्थातच श्री अरुणकुमार डोंगरे यांच्या शासकीय निवासस्थानी होता. साहेबांप्रमाणे सौ अंजलीताई देखील तेवढ्याच प्रेमळ व आत्मियतेने व जिव्हाळ्याने वागणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांनी चांगले पुरणपोळीचे जेवण आम्हाला दिले. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही अमरावतीला निघण्याची घाई करीत होतो तर साहेबांनी आम्हाला थांबवून घेतले. सुप्रसिद्ध आयएएस अधिकारी श्री मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या आईच्या सन्मानार्थ एक कार्यक्रम ठेवलेला होता .साहेब आठवणीने मला व विद्याला त्या कार्यक्रमाला घेऊन गेले आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांशी माझी भेट करून दिली. त्या दिवशी साहेबांनी आम्हाला मुक्काम करायला लावला व दुसऱ्या दिवशी निरोप दिला.
साहेब नांदेडला जिल्हाधिकारी असतानाची गोष्ट. श्री कंठेवाड नावाचे माझे मित्र आहेत. त्यांनी मी आय ए एस अधिकारी होणारच या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मी साहेबांना फोन केला. भेटीची इच्छा व्यक्त केली. साहेब म्हणाले. कार्यालयापेक्षा घरीच या .म्हणजे मनमोकळेपणे बोलता येईल. मी म्हटले सर माझ्याबरोबर आठ दहा मित्र राहतील. ते म्हणाले काही काळजी नका करू .सर्वांना घेऊन या. आम्ही सर्वजण साहेबांच्या निवासस्थानी गेलो. साहेबांनी आणि अंजली वहिनी साहेबांनी आमचे मनापासून स्वागत केले. साहेबांनी वहिनी साहेबांना काठोळे सरांचे आठ दहा मित्र येणार आहेत याची पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे अंजली वहिनी साहेबांनी सर्वांना जेवणा इतका अल्पोपहार दिला आणि सर्वात महत्त्वाचे आमच्या गप्पा झाल्यानंतर साहेब आम्हाला जिल्हाधिकारी बंगल्याच्या फाटकापर्यंत सोडायला आले. माझे सगळे नांदेडचे मित्र पाहतच राहिले .एक जिल्हाधिकारी माणूस फाटकापर्यंत सोडायला येतो ही गोष्ट ते कधीच विसरू शकत नाही.
डोंगरे साहेबांच्या मुलीचा साक्षगंध होता. पुढे लग्न झाले. पत्रिका आलीच पण त्याचबरोबर साहेबांचा फोन आला. काठोळे सर तुम्हाला साक्षगंधाला यायचे आहे. सर तुम्हाला लग्नाला यायचे आहे. नुसती पत्रिका पाठवून ते थांबले नाहीत तर स्वतः फोन करून त्यांनी मला लग्नाला व साक्षगंधाला बोलाविले.
साहेबांची अमरावतीला मानव हक्क आयोगाचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. साहेब ज्या दिवशी रुजू होणार होते त्या दिवशी नागपूरवरून निघाले आणि मला फोन केला काठोळे सर मी आज आयुक्त म्हणून रूजू होत आहे. तुम्ही दहा वाजता विश्रामभवनात या. किती ही विनम्रता किती ही आत्मियता आणि किती हा जिव्हाळा. त्याचमुळे डोंगरे साहेबांचा परिवार फार मोठा वाढला आहे.
आम्ही मिशन आय ए एस चे केंद्र नागपूरला बजाज नगर मध्ये कस्तुरबा भवन मध्ये सुरू केले. साहेबांचे घर आमच्या केंद्राच्या बाजूलाच आहे. मी साहेबांना निमंत्रण द्यायला गेलो. त्या दिवशी त्यांच्या आईचा स्मृती दिवस होता. घरी खूप पाहुणे गोळा झाले होते. सौ अंजली वहिनी सर्वांचे आदरतिथ्य करीत होत्या. मी साहेबांना म्हटले साहेब आपल्या सोयीप्रमाणे भेट द्या. साहेब म्हणाले मी आत्ताच येतो. मी म्हटले साहेब तुमच्याकडे खूप पाहुणे आहेत. तर साहेब म्हणाले तुम्ही मी आणि आयएएस मिशन हे समीकरण एवढे घट्ट आहे आणि आपण रोजचे काम रोज केले आहे केले पाहिजे असे लोकांना सांगतो तर त्याची सुरुवात आपण आपल्यापासूनच केली पाहिजे. साहेब कस्तुरबा भवनात आले. मिशन आय.ए. एस.चे केंद्र पाहिले. समाधान व्यक्त केले आणि या केंद्राच्या पाठीशी मी सदैव समर्थपणे उभा राहील असे आश्वासने दिले व ते त्यांनी प्रत्यक्षात अमलातही आणले.
आज साहेब अमरावतीला विभागीय आयुक्त कार्यालयात मानवी हक्क आयोगाचे आयुक्त म्हणून रुजू झालेले आहेत. एक मनमिळावू समाजाभिमुख आत्मियता जिव्हाळा असलेला आयुक्त अमरावती विभागाला लाभला ही खरोखरच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. महसूल सप्ताहानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
