ओसरगावात संदेश पारकर यांनी घेतले गणरायाचे दर्शन
बारा पाचच्या मांडा वरील गणपती व ग्रामदेवता श्री लिंग माऊलीचे घेतले दर्शन
ओसरगाव :
कणकवलीचे नगराध्यक्ष श्री. संदेश पारकर यांनी ओसरगाव येथील नवसाला पावणाऱ्या बारा पाचच्या मांडा वरील गणरायाचे तसेच ग्रामदेवता श्री लिंग माऊलीचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी कळसुली विभाग प्रमुख श्री. चंद्रहास उर्फ बबली राणे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. गेल्या ३० वर्षांपासून पारकर हे बबली राणे यांच्या कुटुंबीयांच्या विविध कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत आहेत. यंदाही गणेशोत्सवानिमित्त त्यांनी भेट देत दर्शन घेतल्याबद्दल राणे परिवाराच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
