You are currently viewing सिंधुदुर्गनगरी येथे 28 सप्टेंबर रोजी डाक अदालत

सिंधुदुर्गनगरी येथे 28 सप्टेंबर रोजी डाक अदालत

सिंधुदुर्गनगरी

 पोस्टाच्या कार्यपध्दतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उतर मिळाले नसेल अशा तक्रारीसाठी दिनांक 28 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता अधीक्षक डाकघर, सिंधुदुर्गनगरी यांचे कार्यालयामध्ये डाक अदालत आयोजित  केले असल्याची माहिती अधीक्षक डाकघर मयुरेश कोले यांनी दिली आहे.

          विशेषत: टपाल, स्पीड पोस्ट काऊटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनिऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास पाठविली असेल त्यांचे नाव व हुद्दा इत्यादी. संबंधितानी डाक सेवेबाबतची आपली तक्रार मयुरेश कोले, अधिक्षक डाकघर, सिंधुदुर्ग विभाग सिंधुदुर्गनगरी 416812 यांचे नावे दिनांक 26 सप्टेंबर 2022 पर्यंत अथवा त्यापुर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा