You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालयात जात पडताळणी मार्गदर्शन

अर्जुन रावराणे विद्यालयात जात पडताळणी मार्गदर्शन

वैभववाडी

वैभववाडी तालुका शिक्षण संस्था मुंबई संचलित अर्जुन रावराणे विद्यालय, कै. हेमंत केशव रावराणे ज्युनिअर कॉलेज आर्ट्स, कॉमर्स व सायन्स व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल या प्रशालेत सिंधुदुर्ग जिल्हा जात पडताळणी समितीकडून विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या जात प्रमाणपत्र करिता जात पडताळणी मार्गदर्शनाचे आयोजन स्थानिक संस्था अध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रशाळेचे मुख्याध्यापक,जात पडताळणी समिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यवस्थापक संतोष कदम साहेब, पोलीस शिपाई अजित गंगावणे,प्रशांत देसाई, पी. ए.पाटील सर,वाय जी.चव्हाण सर, एस.टी. तुळसनकर सर तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.

 


जात पडताळणी शिबिरामध्ये श्री कदम साहेब यांनी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी करून घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात पडताळणी का करून घेणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन देखील त्यांनी केले या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.टी. तुळसनकर सर यांनी केले तर आभार पी. ए. पाटील सर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four − 4 =