You are currently viewing हरवले मी…
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

हरवले मी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री श्रीम.अरुणा दुद्दलवार लिखीत अप्रतिम ललितलेख…..*

*मनोगत..राधा*
*हरवले मी…*.

गोकुळीचा सावळा,यशोदेच्या राजस बाळा..सुकुमार ,सुंदर,मोहक रूप तुझं…..तुझ्या बालरूपातील लावण्य देखील मोहून घेणारं….
तुला बघितल्यापासून तुझी अनावर ओढ मनाला,भुरळच पडली जणू….मीच नाही रे कान्हा सगळ्या गोकुळीच्या गोपींचा तू लाडका आवडता झालास..
यशोदेकडे बघितलेलं ते पाळण्यातील बालरूप..गोपगड्यांसोबत धेनू चारायला नेतोस तेव्हा तर दृष्ट काढावी असाच..कटी पितांबर,
गळ्यातली सुंदर वैजयंती,मुकुटात खोवलेले निळे जांभळे मोरपीस… आणि तुझा तो सुमधुर पावा…तुझं रूपडं डोळ्यात मावेना रे ….
तू खोडकरही तसाच..मथुरेला जाताना अडवतोस,दहीदूध खातोस,वाटून देतोस…पण कृतःकोपाने बोलते तुला…रागवता नाही येत ना रे..
या श्रीरंगाला…
आणि आता कुंजवनात सूर छेडतोस बासरीचे..कानात प्राण आणून ऐकते ते..घरी कामधंदा,
लहान मुलं,सासूसासरे घरात आणि नवरादेखील…पण तुझ्या पाव्यातील स्वर जणू मोहिनी घालतात…तनमन तुझ्या कडे धाव घेतं…एका अदृश्य ओढीनं…कुठली ही किमया तुझी…मग यमुनेचा हेवा वाटतो,कुंजवनातील फुलांचा राग येतो कारण ते तुझ्या सन्निध असतात..
मी वेडी तशीच धावते तुझ्या स्वरांचा मागोवा घेत..पदर अडकतो,पाय ठेचकळतात पण
तुझा सहवास,तुझी निकटता मला नाकारता येत नाही..
बावरी होते तुला भेटण्यास,अधीर मनाने पोहचते.. तू दंग डोळे मिटून तुझ्या सप्तसूरांच्या लयीत..झाडं,वेली,प्राणी,पक्षी,चल अचल सारे स्तब्ध होऊन ऐकतात तो पावा…मग मी ही हळूच येऊन तुझ्या खांद्यावर माझं डोकं विसावते आणि गवसते सुरांतलं दैवी चैतन्य, नादमधुर संगीत!
माझी तुझ्यात एकरूपता कालिंदी निरखत असते.खुद्कन
हसते ती पण मला कुठले रे भान मोहना….
मी तुझ्या तनामनात भिनलेली,
स्वरात विरघळलेली ,तुझ्या च स्वरूपी अद्वैतात सामावलेली राधा असते…
ती तंद्री कधीच तुटू नये असं वाटतं….मी आणि तू विलग नाही ,एकरूप चिरंतन प्रीतीचं ,भक्तीचं मोहक रूप…
श्यामरंग.. भिनलेली,हरवलेली *राधा…..*. !!!

शब्द संख्या…285
🍁🍃🍃🍁🍃🍃🍁🍃
लेखन….अरूणा दुद्दलवार@✒️

 

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × two =