You are currently viewing छंद आणि मी

छंद आणि मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*छंद आणि मी*

 

छंदाविणा व्यर्थ असशी मनुजा…….!!

 

जसं “अमित्रस्य कुत: सुखम् “म्हणतात,त्याच प्रमाणे जो

छंदाविना असेल ,तो जीवनात कोरडाच राहील.

प्रत्येकाला कसलाही पण छोटा मोठा छंद हा हवाच.

छंद जोपासणे ही अत्यंत वैयक्तिक बाब आहे .मात्र .कधी कधी आपला छंद जसा आपल्या मनाला आनंद देतो तसाच तो इतरांनाही आपला आनंद वाटत असतो.

 

छंद म्हणजे काय याची व्याख्या, सर्वसाधारणपणे फावल्यावेळी करण्याची गोष्ट किंवा रिकाम्या वेळेचा विरंगुळा. पण मला मात्र हे पटत नाही. सामान्यपणे जीवन जगत असताना बालपण, शिक्षण, नोकरी,विवाह, संसार मुलबाळं, निवृत्ती अशी सर्वसामान्य आवश्यक कर्मांची साखळी असते. पण माणसाला खरी ओळख,जगण्यासाठी चा अर्थ आणि समाधान मिळतं ते छंदांमुळे आणि याचा अनुभव मी घेतला, घेतही आहे.

 

मला स्वत:ला वाचनाचा मनस्वी छंद आहे आणि या वाचनानेच मला लेखनाची गोडी लागली.आणि वाचन व लेखन असा जोड छंद मला अगदी लहानपणापासून जडला. बाकी तसे लहान मोठे छंदही आहेतच.नृत्य करणे.गप्पा करणे,पत्ते खेळणे मित्रमैत्रीणी जोडणे,क्वचित कधी विणकाम, भरतकामही.,गाणी ऐकणे .हं!गायनाच्या वाटेला मात्र मी कधी गेले नाही.पण या छोट्या मोठ्या छंदांननीही मला खूप आनंद आजपर्यंत दिलाय् ,देत आहेत.

 

पण वाचन आणि लेखन हे माझे छंद माझे खरे सोबती आहेत.

वाचनाने माझं मन निरोगी आणि समृद्घ केलं आणि लेखनाने माझ्या मनातलं सांगण्याची ,पाह्यलेलं शब्दात

रंगवण्याची,अनुभवांना परस्परांत वाटण्याची क्षमता दिली. माझ्या अनेक वाचकांना मी माझ्या लेखनातून

आनंद तर दिलाच आहे पण प्रसंगी त्यांच्या भावनांना ही मोकळी वाट करुन दिली आहे.

 

माझ्या लेखन छंदाला एक मजेशीर पार्श्वभूमी आहे. मला लिहिता येतं आणि लिहिल्यानंतर मी आनंदित होते याचा शोध मला एका प्रसंगामुळे लागला. मी लहान होते तेव्हा.

 

मी आणि माझी आई माझ्यासाठी कपडे खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेलो होतो. माझे सगळे ड्रेसेस आईच शिवायची. माझ्यासाठी शिवल्या जाणाऱ्या ड्रेसचे डिझाईन, कापड, कापडाचा रंग हे ही सर्व तीच ठरवायची. पण त्यादिवशी मात्र मला एक कापड फारच आवडले होते. मी आईजवळ तेच कापड खरेदी करण्यासाठी हट्ट धरून बसले. पण आईने ते घेतले नाही आणि न घेण्याचे कारणही सांगितले.

” हा रंग तुला शोभणार नाही. हा गोऱ्या मुलींना छान दिसेल.” जणू काही माझ्या काळया रंगावर तिने नकळत शिक्कामोर्तब केल्यासारखे मला वाटले आणि मी प्रचंड दुखावले गेले. एक वेगळीच अवस्था माझ्या मनाची झाली. ती अवस्था इतकी वाईट होती की माझ्या संपूर्ण अंतर्देहात एक भयंकर वादळ मी अनुभवलं आणि मला जे वाटलं, जे सुचलं, माझा राग, माझं दुःख ,माझ्या आईला ते न जाणवणं वगैरे सगळं मी जसे शब्द सापडतील, जशी वाक्य जुळतील तसे लिहीत गेले आणि लिहून झाल्यावर मला एकदम शांत मोकळं वाटलं. मग माझ्या लक्षात आलं “वा! हे छान आहे. लिहून मोकळं होणं.”

त्या दिवसापासून कागद कलम माझे दोस्त झाले आणि आजवर माझ्या या लेखन छंदाने मला अतूट साथ दिलेली आहे.

 

मी साड्यांच्या दुनियेत रमत नाही इतकी पुस्तकांच्या विश्वात रमते. तो गंध ते वातावरणच मला सुखावते.

तिथे मला पुल भेटतात,खांडेकर, जीए, विंदा ,पाडगावकर,मतकरी असे अनेक गुरुजन भेटतात.

काही नव्या लेखक ,लेखिकांशीही मी चटकन् मैत्री करुन घेते.

माझ्या वाचनाच्या छंदाने माझ्यात खूप सकारात्मकता

रुजवली.कधी निराशा जाणवली ,हरल्यासारखं वाटलं

तर कुठुन तरी वाचलेले हरिवंशराय बच्चन यांचे शब्द

सांत्वन करायला येतात,

।हरना तब आवश्यक हो जाता है, जब लडाई अपनोंसे

हो!

और जीतना तब आवश्यक हो जाता है

जब लडाई अपने आपसे हो।।

 

असा कितीतरी माझा पुस्तक परिवार माझ्या छंदामुळेच

माझ्या सोबत सतत असतो. तो मला माझं एकटेपण

विसरायला लावतो.

गोट्या ,फास्टर फेणे ,किशोर चांदोबा ,हे आजही मला माझ्या बालविश्वात घेउन जातात.

“फुलपाखरु छान किती दिसते.”ही कविता मला आनंदी जीवन जगायला शिकवतात.

 

या छंंदाने माझ्यातलं माणूसपण टिकवलं. स्वतःला शोधण्याची, व्यक्त होण्याची संधी दिली. माणूस टिपण्याची सवय लावली. त्यांची सुखदुःख खोलवर जाऊन ओळखायचं एक मन मला मिळालं त्यांच्या भावनांशी एकरूप होण्याचं एक शास्त्र साधता आलं.

या ऊतार वयात तर माझ्या या लेखन, वाचनाच्या छंदाने

माझ्या आयुष्याची संध्याकाळ सुसह्य केली आहे.

वेळ कसा घालवावा हा प्रश्न मला कधी पडतच

नाही.

करोनाच्या भीषण वातावरणातही हंसरं,खेळकर मजेत मला माझ्या या छंदाने ठेवले होते.

म्हणून म्हणते प्रत्येकाने एकतरी छंद जरुर जोपासावा.

छंद असतो मित्र.,.

छंद असते विश्वासाची जागा

छंदच असते आपली सावली

छंदच असते आपली आधाराची काठी……

 

 

धन्यवाद!!

सौ. राधिका भांडारकर

पुणे.

 

 

*संवाद मिडिया*

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण (Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

*Advt Link👇*

————————————————–

📝 *प्रवेश सुरु!* *प्रवेश सुरु!*📝

 

👩‍👩‍👧‍👦 *मुक्तांगण ( Day Care Centre + Classes)*👩‍👩‍👧‍👦

 

👉 Ju Kg ते आठवी वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी जेवण 🍛व क्लासची एकत्रित सुविधा 📚👩🏻‍💻

 

(होमवर्क तसेच Grammer इत्यादीचा परिपूर्ण अभ्यासक्रम समाविष्ट)📑

 

👉 TV, Mobile यापासून दूर ठेऊन मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी अग्रेशीत

 

⏰ *वेळ: सकाळी 10 ते 5:30 पर्यंत*

 

👉 (मिलाग्रीस हायस्कूल मधील मुलांना पिकअप करण्याची सोय आहे)

 

*पत्ता:* बाबा फर्नांडिस F – 122, बांदेकर मेस समोर, मिलाग्रीस हायस्कूल नजिक, सालईवाडा, सावंतवाडी

 

📱 *संपर्क:*

सौ.सरोज राऊळ मो.नं: 8983757132

सौ.सुरेखा बोंद्रे मो. नं: 8975257453

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा