You are currently viewing सावंतवाडीत ९ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी संस्थान व अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडीत ९ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी संस्थान व अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन

सावंतवाडी :

 

सावंतवाडीतील राजवाडा परिसरात रविवारी ९ ऑक्टोबर रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन सावंतवाडी संस्थान व अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने व सांगली येथील उषःकाल अभिनव इन्सिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स या अद्ययावत हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आले आहे. याचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत शिबीराचे निमंत्रक तथा सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले, अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे. रविवारी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९.३० ते १२.३० या वेळेत राजवाडा परिसरात या महा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी माजी केंद्रिय मंत्री सुरेश प्रभू तर प्रमुख अतिथी प्रसार भारतीचे पश्चिम भारताचे अतिरिक्त निर्देशक निरज अग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा