सावंतवाडी
भटके कुत्रे व मोकाट गुरांचे प्रमाण शहरात प्रचंड वाढत चालले आहे . सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आज नगरपरिषद सावंतवाडी चे मुख्याधिकारी जावडेकर यांना निवेदन देण्यात आले. जावडेकर यांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
राजू मसुरकर यांनी कुत्र्यांची नसबंदी करणाऱ्या नागपूर येथील टीमच्या प्रमुखाला फोन लावून त्यांच्याशी जावडेकर यांना बोलायला दिलं असता जावडेकर यांनी त्यांच्याकडून सर्व प्रक्रियेची माहिती घेतली व पुढच्या आठवड्यात त्यांच्याशी प्रत्यक्षात मीटिंग ठेवण्यात येणार आहे असे जावडेकर यांनी सांगितले.
त्यानंतर कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी टेंडर काढून सर्वप्रथम 100 ते 150 कुत्र्यांवर नसबंदीचा प्रयोग करण्यात येणार तसेच मोकाट फिरणाऱ्या गुरांच्या मालकांना गुरांच्या बंदोबसाचा आदेश काढला जाणार आहे जर त्यांनी त्यांचा बंदोबस्त केला नाही तर त्यांना कोनवाड्यामध्ये ठेवण्यात येईल असे ते पुढे म्हणाले.
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजू मसुरकर व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. तर माजी नगरसेविका लोबो मॅडम यांनी हा विषय उचलून धरला. लवकरच या दोन्हीही विषयांवर योग्य तात्काळ तोडगा काढला जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी जावडेकर यांनी दिली आहे यावेळी माजी नगरसेविका अनारोजीन लोबो व सुनील कोरगावकर उपस्थित होते.