You are currently viewing हवीहवीशी चाळीशी.
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

हवीहवीशी चाळीशी.

*काव्यनिनाद साहित्य मंच समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.योगिनी व पैठणकर, नाशिक लिखित अप्रतिम लेख.*

*हवीहवीशी चाळीशी.*

खूप जणं म्हणतात,खरं तर आयूष्य चाळीशी नंतरच सुरु होतं. जवळपास सेकंड ईनींग असते ती,. मानसशास्त्ररा नुसार बहुतेक स्त्रिया 40 नंतर खूप सुंदर, आकर्षक वाटतात,.त्या हौशी प्रेमळ कुशाग्र थोड्या वेगळ्या प्रकारे प्रेजैंटेबल होतात,. ईतके वर्ष काम, धाक. वरीष्ठांचं लक्ष यातच आयूष्य संपतं. पण आता त्या थोड्या स्वतः कडे लक्ष देऊ लागतात. पुरुषांचं माहीत नाही, पण आम्ही मात्र योगा, संगीत, कार्यक्रम,नीरनीराळ्या भीशा,. गौसींपींगही , या सगळ्यात रमतो. धड ना ईकडे धड ना तीकडे अशी स्थीती. तरुणपणात रंगवलेली स्वप्नं. ईच्छा आकांक्षा स्वतः चे घर,. प्रेम नवी काही खरेदी,. मुलांबद्दल च्या अपेक्षा सारंच पुर्ण होणार असतं. सहजीवनातील वेगळ्या टप्प्यावर आपण आलेलो असतो. थोड्या जबाबदाऱ्या,. पुर्ण तर काही अपुर्ण,. थोडी कमी झालेली उमेद,. घरातले व्याप, आई वडीलांच्या तब्येती दवाखाने,औषधोपचार,. सारंच चीत्र बदलत असतं.
थोडं समजदार , थोडं नासमझ,. थोडं बालीश थोडं प्रौढ असं नातं. असं ते वयच. काही नाती उच्छूंखल. मोकळ्या मनाची बेफीकीर वाटतात. खरं *”मैत्र* जपलं जातं ते या वयात. कारण maturity. परीपक्वता असते. बऱ्यापैकी ओळखी असल्याने मीत्र मैत्रीणी हवेहवेसे वाटतात. एक समजदारीचं कवच ,एक प्रेमाचं विश्वासाचं वलय. एक कृतकृत्य ता. समाधान ,आनंद चेहऱ्यावर दिसतो. पती पत्नीच्या नात्यातली गोडी वाढते. २०/२२ वर्ष सहजीवनाची साथ असल्याने एकमेकांचे सुखदुःख , आवडी ,*”टोमणे*. जोक लगेच कळतात. प्रत्येक गोष्ट समजून व drawback ओळखून संसार सुरळीत सुरू असतो. थोडं हटके *”Bold n Beautiful*. ,प्रवास,. वेगळं विश्व, जरा आधूनीक स्टाईलीश कपडे. नवीन गोष्टी try करुन शिकणे. ज्या गोष्टींना आधी वेळ मीळाला नसतो त्या करणे. अभ्यास परीक्षा याबरोबरच मूलांचे मीत्र बनणे ही १ मोठी गोष्ट. एकमेकांना सांभाळुन आनंदी रहाणे हीच या वयाची गुरुकिल्ली. आणी ती समर्पण ,त्याग व साथीतच मीळते.

तरुणपणातील मोहमयी रूप. सौंदर्य. बाह्य आकर्षण तात्पुरतं असतं हे कळतं. देवधर्म. प्रवास. नातेसंबंध. कौटुंबिक कार्यक्रम. नोकरीतील बढती पुरस्कार यांनी जरा आयुष्यात अधिक रंग भरले जातात. मोह. ईष्या बरोबरी,. हट्ट. या पलीकडै विश्वास वाढत जाऊन नातं अधीक खूलत जातं. चाळीशीतील *”चाळीशी* लावून या रंगीबीरंगी जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन च पार बदलतो. हो नं?…

योगिनी .व पैठणकर…नाशिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + five =