You are currently viewing वेंगुर्ला शिरोडा रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू….

वेंगुर्ला शिरोडा रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू….

शिवसेना विभाग प्रमुख कार्मिस आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या निवेदनाची दखल.

वेंगुर्ला

वेंगुर्ला शिरोडा मार्गावरील खड्डेमय झालेल्या रस्त्यांची आठ दिवसात दुरुस्ती करा अन्यथा ग्रामस्थांना घेऊन रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेना विभाग प्रमुख कार्मिस अल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली उभादांडा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल घेत आज वेंगुर्ला शिरोडा रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले याबाबत कार्मिस अल्मेडा व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाचे आभार मानले. वेंगुर्ला शिरोडा मार्गावर ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. उभादांडा वाघेश्वरवाडी पासून कांबळेवाडी सुखटनवाडी वरचेमाडवाडी मध्ये तर पादचाऱ्यांना चालणेही मुश्किल झाले होते. तसेच हा रस्ता मोचेमाड पासून पुढे शिरोडा पर्यंत पूर्ण चा खड्डेमय झाल्याने याठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या खड्डेमय रस्त्यांमुळे मोठी वाहने तसेच मच्छीमार, शेतकरी, बागातदार, लोकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आठ दिवसात या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा शिवसेना विभाग प्रमुख कार्मिस आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली उभादांडा शिवसेनेने बांधकाम अधिकाऱ्यांना निवेदना मार्फत दिला होता. याची दखल घेत आज या रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी त्या रस्त्याची पाहणी करून समाधान व्यक्त केले. या कामाबाबत कार्मिस आल्मेडा व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाचे औटी व मुळे मॅडम यांचे आभार मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 20 =