You are currently viewing आजगाव साहित्य कट्ट्यावर जयवंत दळवींचे पुण्यस्मरण

आजगाव साहित्य कट्ट्यावर जयवंत दळवींचे पुण्यस्मरण

 

“साहित्यिक जयवंत दळवींचा मला सहवास लाभला, हे माझे भाग्य. ज्या ज्या वेळेस ते आरवलीत यायचे, त्या त्या वेळी ते माझ्या वडिलांच्या दुकानात यायचे. हळुहळू माझा त्यांच्याशी स्नेह जुळला. मीही मग त्याना भेटू लागलो. त्यांच्या व त्यांच्या पत्नी उमाकाकींच्या अंतकाळातही मी त्याना भेटलो. अनेक वैयक्तिक गोष्टीही त्यानी मला सांगितल्या. त्यांचे भरपूर प्रेम मला लाभले. “,असे उद्गार ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे यांनी आजगाव वाचनालयात काढले. निमित्त होते साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या तेविसाव्या मासिक सभेचे. साहित्यिक जयवंत दळवी यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ते बोलत होते. दळवी विषयीच्या अनेक आठवणींना त्यानी उजाळा दिला.
सभेची सुरुवात दळवींच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यांचे पुतणे सचिन दळवी यांनी त्यांना पुष्पांजली अर्पण केली. नंतर कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक केले. तसेच मुंबईस्थित दिगंबर जोशी यानी पाठवलेली दळवींच्या लेखनाची एक ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली.
सचिन दळवी यांनीही आपल्या काकां विषयीच्या आठवणी सांगितल्या. त्यांची साधी रहाणी, मत्स्य प्रेम, लोकांशी हितगुज, कुटुंबाला आधार याविषयी ते बोलले. ‘जयाकाकाना टाक आणि दौतीने लिहिणे अधिक पसंत होते ‘ याचा त्यानी आवर्जून उल्लेख केला.
नंतरच्या चर्चेत ईश्वर थडके, डाॅ. सुधाकर ठाकूर, डाॅ.मधुकर घारपुरे, मीरा आपटे, एकनाथ शेटकर यांनी भाग घेतला. सभेला सोमा गावडे, विशाल उगवेकर , आत्माराम बागलकर, प्रिया आजगावकर, रश्मी आजगावकर, उत्तम भागीत, शुभंकर ठाकूर, मीरा ठाकूर, अनिता सौदागर, मानसी गवंडे, देवयानी आजगावकर, अंकुश आजगावकर, भाऊसाहेब केशर आणि राजू काळे आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − four =