सिंधुदुर्गनगरी :
सावंतवाडी तालुक्यातील मौजे बांदा-निमजगा येथील घर क्रमांक 533 चा 50 मीटर परिसर, मौजे बांदा-आंबेडकरनगर येथील घर क्रमांक 1041 अ व शेजारील 05 मीटर परिसर येथे दि. 21 ऑक्टोंबर 2020 पर्यंत, मौजे वेर्ले-झेंगाटवाडी येथील घर क्रमांक 711 चा 50 मीटर परिसर, मौजे माजगांव-दळवीवाडा येथील घर क्रमांक 500 चा 20 मीटर परिसर, सावंतवाडी येथील घर क्रमांक 41 चे आजुबाजुचे क्षेत्र पुर्व-05 मी. मोकळी जागा, पश्चिम-05 मी. मोकळी जागा व मुख्य डांबरी रस्ता, उत्तर -02 मी. मोकळी जागा व दक्षिण -01 मी. मोकळी जागा चहुबांजुचे अंदाजे क्षेत्र – 77 चौ. मी. चा परिसर येथे दि. 22 ऑक्टोंबर 2020 पर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
वरील झोनमध्ये संबंधित दिनाकांपर्यंत रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिले आहेत