You are currently viewing दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींसाठी आता V.C. द्वारे तक्रार निवारण सभा

दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींसाठी आता V.C. द्वारे तक्रार निवारण सभा

दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारींसाठी आता V.C. द्वारे तक्रार निवारण सभा

सिंधुदुर्गनगरी 

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम २३ नुसार जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार या समितीची सभा प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे आयोजित केली जाते. १५ तारखेला  कार्यालयीन सुट्टी असल्यास  लगतच्या  कार्यालयीन दिवशी घेण्यात येते. तालुकास्तरावरील दिव्यांग व्यक्तींच्या तक्रार निवारणाच्या गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले  आहे. तालुकास्तरावर तक्रारकर्त्यांचे समाधान न झाल्यास संबंधित तक्रारकर्ते जिल्हास्तरावर अपिल दाखल करू शकतात.

तथापि,उक्त सभा जिल्हास्तरावर आयोजित केल्यामुळे तालुकास्तरावरील दिव्यांग व्यक्तींना सभेस उपस्थित राहणेस अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार ही सभा आता (V.C.) द्वारे घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना आवाहन करण्यात येते की, तक्रार निवारण समितीच्या बैठकीची माहिती वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल. सदर सभेला आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात उपस्थित राहावे.

याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी यांचे मोबा. ९४२३८७८३१५ क्रमांकावर संपर्क साधावा.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा