You are currently viewing सिंधुदुर्गातुन उद्या मराठा समाज बांधवा तर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १ लाख सह्यांचे निवेदन..

सिंधुदुर्गातुन उद्या मराठा समाज बांधवा तर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १ लाख सह्यांचे निवेदन..

जिल्हा समन्वयक अॅड. सुहास सावंत यांची माहिती..

सावंतवाडी
मराठा समाज आरक्षणाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १ लाख सह्यांचे निवेदन उद्या सोमवार दि.२८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील समाज बांधव देणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक अॅड. सुहास सावंत यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून कोविड नियमावलीचे पालन करून प्रत्येक तालुक्यामध्ये ही निवेदने देण्यात येणार आहेत, सर्वांना सूचना देण्यात आली असून जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांमध्ये नियोजन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तशात जिल्ह्यातील मराठा बांधवांमध्ये प्रतिक्रिया उमटल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना एक लाख सह्यांचे निवेदन पाठवण्याचा एका बैठकीत निर्णय घेतला आणि जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांमध्ये निवेदने संकलित करण्यात आली आहेत, असे श्री. सावंत यांनी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून तहसिलदारांना निवेदन दिली जावीत म्हणून सर्वांना विनंती करण्यात आली आहे. उद्या प्रत्येक तालुक्यातून मराठा समाज बांधव निवेदन येतील अशी आशा अॅड. सावंत यांनी व्यक्त केली.जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांमध्ये असणारी एकजूट कायम टिकून पुढील काळात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत वेळोवेळी राज्य पातळीवर घेतलेल्या निर्णयांच्या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियोजन करण्यात येणार असल्याचे अॅड. सावंत म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 10 =