You are currently viewing महिला समुपदेशन केंद्राचे सावंतवाडीत उद्घाटन

महिला समुपदेशन केंद्राचे सावंतवाडीत उद्घाटन

खा सुप्रिया सुळे यांची ऑनलाईन उपस्थिती; अनुराधा प्रवीण भोसले यांनी केले उद्घाटन

सावंतवाडी

महिलांसाठी कौटुंबिक समस्यांबाबत प्राथमिक समुपदेशन, कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन केंद्राचे आज सावंतवाडीत उद्घाटन करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन सौ.अनुराधा प्रवीण भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थितीती दर्शवत महिलांना मार्गदर्शन केले.

महिलांवर घरात होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी महिलांना योग्य मार्गदर्शन व्हावे यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली असून, याद्वारे महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

यावेळी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा समन्वयक सौ. अर्चना घारे- परब, विनया बाड, मीनाक्षी, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रेया माळकर, वेदिका गावडे, रेवती राणे, मंगल कामंत, अफरोज राजगुरू, डॉ. सोनल लेले, चित्रा देसाई, सावली पाटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 2 =