You are currently viewing लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार प्रदान

लायन्स क्लब ऑफ सावंतवाडीच्या वतीने कोविड योद्धा पुरस्कार प्रदान

सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी आणि आरोग्य निरीक्षक दीपक म्हापसेकर यांना देण्यात आला पुरस्कार

सावंतवाडी

सावंतवाडी लायन्स क्लब च्या वतीने सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी व सावंतवाडी नगर परिषद आरोग्य निरीक्षक  दीपक म्हापसेकर यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. देव्या सूर्याजी व  दीपक म्हापसेकर यांनी मागील दोन वर्षात कोविड या गंभीर साथीच्या पाश्वभूमीवर रक्तदान, अन्नदान, स्वछता, जंतूनाशक फवारणी, साथ प्रतिबंधक प्रभावी उपाययोजना आदी कार्याची दखल घेऊन लायन्स क्लब सावंतवाडीच्या वतीने क्लब चे झोन चेअरमन  अशोक देसाई यांच्या अधिकृत क्लब भेट दरम्यान त्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी क्लब अध्यक्ष ला. अँड. परिमल नाईक, सचिव ला. अमेय पै, उपाध्यक्ष ला. विद्याधर तावडे, ला. गजानन नाईक, ला. बाळ बोर्डेकर, ला. रवी स्वार, ला टकेकर, ला. अरविंद पोकर, ला. अभिजित पणदूरकर, ला. संतोष चोडणकर, ला. महेश पाटील आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा