You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध वाढीसाठी तीन सामंजस्य करार…!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध वाढीसाठी तीन सामंजस्य करार…!

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्हा धवल क्रांतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठीचे प्रयत्न सर्वच स्तरावरून सध्या सुरू आहेत .एकेकाळी दुधासाठी वाणवा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या प्रतिदिन तीस हजार लिटर दूध निर्मिती होत आहे . येत्या चार वर्षात एक लाख लिटर दूध प्रतिदिन निर्मितीचे लक्ष जिल्ह्यात ठेवण्यात आलेले आहे . याच अनुषंगाने प्रयत्न सर्व दिशेने आणि सर्व स्तरावरून सुरू आहेत . सिंधुदुर्ग जिल्हा बँक,सिंधुदुर्ग जिल्हा परिषद,गोकुळ दूध आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विषयक गोठा बांधणी, कृत्रीम रेतन सेवा योजना राबविणे आणि बायोगँस संदर्भात, महत्त्वपूर्ण असे तीन सामंजस्य करार करण्यात आले . सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर ,गोकुळचे अधिकारी डॉ. नितीन रेडकर , भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ.प्रसाद। देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे सामंजस्य करार करण्यात आले.

या करारामध्ये मुख्यत्वे कृत्रिम रेतन सेवादाता अर्थात गोपाळ सेवादाता , आदर्श गोठा बांधणी आणि बायोगॅस बांधणी या तीन मुख्य उद्देशांचा समावेश आहे . गोपाळ सेवादाता शेतकऱ्यांना गोकुळ दूध संघामार्फत 35 दिवसाचे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे .त्यासाठी होणारा खर्च या चार संस्था उचलणार आहेत .कृत्रिम रेतन सेवादाता अर्थात गोपाळ सेवादाता यांना आवश्यक ते तांत्रिक सहाय्यक गोकुळ संघ करेल. तर आवश्यक वाहनासाठी अल्प दराने कर्ज पुरवठा सिंधुदुर्ग जिल्हा बँक करणार आहे . सिंधुदुर्ग बँकेकडून दूध उत्पादकास आदर्श गोठा बांधणीसाठी ब्रिज लोन स्वरूपात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. बायोगॅस बांधणी संदर्भात सिंधुदुर्ग बँक कर्ज पुरवठा करेल . जिल्हा परिषद बायोगॅस बांधणी करता गावांची निवड करून नरेगा अंतर्गत अनुदान देईल . भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान बायोगॅस बांधणीविषयी प्रबोधन आणि बांधकाम करण्यासाठी तंत्रज्ञ उपलब्ध करून देणार आहे .

या सामंजस्य कराराचा गोपालक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल तसेच जिल्ह्यातील दुग्ध निर्मितीचे लक्ष गाठण्यासाठी हा करार मदतगार साबित होणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 5 =