You are currently viewing यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा..

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा..

सावंतवाडी

भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंती प्रित्यर्थ साजरा करण्यात येणारा ‘अभियंता दिन’ अर्थात ‘इंजिनिअर्स डे’ यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मर्चंट नेव्हीमधील चीफ इंजिनियर श्री. राहुल ग.टिपणीस हे उपस्थित होते..
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व डॉ.विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.प्रसाद सावंत यांनी केले. त्यानंतर मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.अभिषेक राणे, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा.दीपक पाटील व कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा.प्रशांत काटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले..
कॉलेजचे प्राचार्य गजानन भोसले यांनी विद्यार्थ्यांना अभियंता नावासोबत येणाऱ्या सामाजिक जबाबदारीची व देशाच्या विकासाकरिता आवश्यक योगदानाची जाणीव करून दिली..
राहुल टिपणीस यांनी मर्चंट नेव्हीमध्ये उज्ज्वल भवितव्य कसे घडवावे याबाबत मार्गदर्शन केले. येणाऱ्या काळात अभियांत्रिकी क्षेत्र अजून मोठ्या प्रमाणावर विस्तारणार असून विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवावे असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
कॉलेजमध्ये सकाळच्या सत्रात क्विझ, पोस्टर व मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन्सचे आयोजन करण्यात आले होते. यामधील विजयी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच बोर्डाच्या समर-2022 परीक्षेत यशस्वी ठरलेल्या प्रत्येक विभागाच्या पहिल्या तीन क्रमांकांनाही पारितोषिक देऊन गौरविण्यात आले..
कार्यक्रमाला संस्थेचे सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सिव्हिल विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमर प्रभू तर आभार प्रदर्शन संस्थेचे जनसंपर्क अधिकारी नितीन सांडये यांनी केले..

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 14 =