You are currently viewing मुंबई विद्यापीठाकडून “आदर्श प्राचार्य” पुरस्काराने डॉ.दिलीप लक्ष्मण भारमल सन्मानीत

मुंबई विद्यापीठाकडून “आदर्श प्राचार्य” पुरस्काराने डॉ.दिलीप लक्ष्मण भारमल सन्मानीत

*मुंबई विद्यापीठाकडून “आदर्श प्राचार्य” पुरस्काराने डॉ.दिलीप लक्ष्मण भारमल सन्मानीत*

*डॉ.दिलीप भारमल सावंतवाडीच्या श्री.पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य*

सावंतवाडी येथील श्री.पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप लक्ष्मण भारमल यांचा मुंबई विद्यापीठाकडून *आदर्श प्राचार्य* म्हणून गौरव करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत मुंबई विद्यापीठाने डॉ.दिलीप भारमल यांना मुंबई येथे सन्मानपूर्वक हा पुरस्कार देण्यात आला. डॉ.दिलीप भारमल यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सावंतवाडी संस्थानचे राजे तथा महाविद्यालयाचे विश्वस्त खेमसावंत भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री.पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने केलेल्या सत्कार सोहळ्यासाठी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब श्रीमंत सौ.शुभदादेवी खेमसावंत भोसले, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त श्रीमंत युवराज लखमराजे खेमसावंत भोसले, श्रीमंत सौ. श्रद्धाराजे भोसले, प्रा.डी. टी. देसाई आदी उपस्थित होते.
डॉ.दिलीप भारमल हे प्राणिशास्त्र विषयाचे अधिव्याख्याता म्हणून १९८७ साली श्री.पंचम खेमराज महाविद्यालयात रुजू झाले होते. आपली शिकविण्याची उत्तम शैली आणि चेहऱ्यावरील हसतमुख प्रसन्न भाव यामुळे ते विद्यार्थिपिय प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम एस्सी प्राणिशास्त्र ही पदवी घेतली होती. १९९६ आणि २०१२ अशी दोनवेळा त्यांनी शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य अशी पी.एच.डी. ही पदवी प्राप्त केली असून एल.एल.बी. ची पदवी देखील मिळवली आहे. डॉ.भारमल यांनी २००८ सालापासून श्री.पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली असून महाविद्यालयाचा उत्तम दर्जा देखील राखला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणूनच त्यांना “आदर्श प्राचार्य” पुरस्कार प्राप्त झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा