You are currently viewing भाजपा वैद्यकीय आघाडी कडून समाजविकास अधिकाऱ्यांना न्याय

भाजपा वैद्यकीय आघाडी कडून समाजविकास अधिकाऱ्यांना न्याय

मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील कंत्राटी समाजविकास अधिकारयांनी यांनी मानले भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचे आभार

मुंबई महानगरपालिका रुग्णालयात कंत्राटी तत्वावर समाजविकास अधिकारी कार्यरत असून ते रुग्णसेवा संबंधित विविध उपक्रमांत मोलाची कामगिरी बजावत असतात. कोविड१९ काळात डॉक्टर, परिचारिका यांच्या इतकेच समाजविकास अधिकारी वर्गाने महानगरपालिका रुग्णालयात मोलाची कामगिरी बजावली. कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेला हा अधिकारी वर्ग पूर्णवेळ भरती प्रक्रियेत त्यांना प्राधान्य मिळावे याकरिता विविध लोकप्रतिनिधींना निवेदने देत होता. अखेरीस त्यांच्या शिष्टमंडळाने भाजपा वैद्यकीय आघाडीकडे दाद मागायचे ठरवले. आघाडीचे राज्य सह-संयोजक तथा कोकण विभाग प्रभारी डॉ अमेय देसाई यांची दोन आठवड्यापूर्वी भेट घेऊन त्यांना हा विषय सांगितला. विषयाची तीव्रता लक्षात घेता डॉ देसाई यांनी हा विषय लगेच सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत नेण्याचे आश्वस्त केले आणि त्याच दिवशी तसे केले. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सदरील विषयाची नोंद घेत सन्माननीय उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री महोदयांनी कोविड१९
काळात कंत्राटी वैद्यकीय सेवा बजावलेल्यांना सार्वजनिक आरोग्य खात्यामधील भरतीच्या वेळी त्यांच्या कामाची नोंद घेऊन त्यांची गुणांकन कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देश दिले. याबद्दल आज त्या समाजविकास अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय आघाडीचे प्रतिनिधी म्हणून डॉ देसाई यांचे नरिमन पॉईंट येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात येऊन आभार मानले. त्याच बरोबर ह्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा भेट घेऊन त्यांचे आभार मानण्याचे ठरविले.

भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन आभार मानताना  मुंबई महानगरपालिका रुग्णालयातील कंत्राटी समाजविकास अधिकारी .

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =