You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल हे मुंबई विद्यापीठाच्या ‘आदर्श प्राचार्य’ या पुरस्काराने सन्मानित.

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल हे मुंबई विद्यापीठाच्या ‘आदर्श प्राचार्य’ या पुरस्काराने सन्मानित.

सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एल भारमल यांना मुंबई विद्यापीठाचा आदर्श प्राचार्य हा पुरस्कार मिळाला आहे .सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले त्यांच्या हस्ते डॉ.डी एल भारमल यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.यावेळी व्यासपिठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब श्रीमंत सौ.शुभदादेवी खेमसावंत भोंसले , संस्थेचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले उपस्थित होते .
डॉ दिलीप लक्ष्मण भारमल यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून एम एस्सी प्राणिशास्त्र ही पदवी धारण केल्यानंतर ते१९८७ मध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागामध्ये अधिव्याख्याता या पदावर रुजू झाले .२००८ पासून त्यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला.१९९६ मध्ये त्यांनी शिक्षण क्षेत्रातील बहुमूल्य पदवी पी एच डी मिळवली .त्यानंतर पुन्हा त्यांनी २०१२ मध्ये दुसर्यांदा पी एच डी प्राप्त केली. त्यानंतर एल एल बी पदवी सुद्धा प्राप्त केली.

महाविद्यालयाचे प्रशासन सांभाळत असताना ते राष्ट्रीय आणि विद्यापीठ स्तरावरील विविध कमिट्यावर कार्य करीत आहेत :-

संस्थेचे अध्यक्ष राजेसाहेब यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले असून अशीच तुमची प्रगती होत राहो असे सांगितले .या वेळी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रा . डी .टी. देसाई, सहसंचालक अॅडव्होकेट श्यामराव सावंत,महाविद्यालयातील प्रथम प्राचार्य डॉ डी जी कोपरकर यांचे कुटुंबीय , माजी प्राध्यापक वर्ग, माजी विद्यार्थी , महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ प्रा डी जी बोर्डे यांनी केले तर आभार श्री अमित कोपरकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + twelve =