You are currently viewing शुटिंगबॉल पंच अशोक दाभोलकर, शशिकांत गवंडे यांचा औरंगाबाद येथे सत्कार

शुटिंगबॉल पंच अशोक दाभोलकर, शशिकांत गवंडे यांचा औरंगाबाद येथे सत्कार

वेंगुर्ले :

 

भूतपूर्व फेडरेशन शुटिंगबॉल पंच व स्पर्धा नियंत्रक वेंगुर्ले येथील अशोक दाभोलकर यांना कृषी मंत्री श्री. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लौड, औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय शुटिंगबॉल स्पर्धेसाठी स्पर्धा मार्गदर्शन तसेच स्पर्धा नियंत्रक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.

दोन दिवस कृषी मंत्री श्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत अतिशय शिस्तबद्धपणे संपन्न झालेल्या ह्या स्पर्धेत देशभरातील ४८ संघानी सहभाग नोंदविला होता. त्याचवेळी अशोक दाभोलकर यांनी क्रीडा क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल औरंगाबादचे नामवंत राष्ट्रीय शुटिंगबॉल खेळाडू व विद्यमान नगराध्यक्ष श्री. आबासाहेब काळे ह्यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले.

तसेच राष्ट्रीय पंच श्री. शशिकांत गवंडे ह्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू अशोक चौधरी, विष्णू निकमसर, रामभाऊ कोलते, राजेन्द्र मोहिते, बाळू पाटील तसेच राष्ट्रीय खेळाडू सर्वश्री पांडुरंग कदम, मुस्ताकसर (नगर), अश्पाकभाई, मधुकर दांडगे, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक मन्सूर काद्री सर, डि.एस.पी. रामलाल शहादे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 7 =