You are currently viewing काँग्रेस कार्यकर्ते महानंद चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश

काँग्रेस कार्यकर्ते महानंद चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश

कणकवली:

कणकवली तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे माजी पदाधिकारी महानंदा चव्हाण यांनी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतिश सावंत, संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. महानंदा चव्हाण यांची शिवसेना अनुसूचित जाती सेल उपतालुकप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे, नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, माजी नगरसेवक प्रसाद अंधारी, उपतालुकाप्रमुख महेश कोदे, महिला उपशहरसंघटीका दिव्या साळगावकर, योगेश मुंज, अमित मयेकर, सोमा गायकवाड, प्रसाद चव्हाण, भिवा परब आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा