You are currently viewing लायन्स क्लबच्या वतीने हेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत मुलांची आरोग्य तपासणी

लायन्स क्लबच्या वतीने हेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत मुलांची आरोग्य तपासणी

इचलकरंजी

इचलकरंजी येथील देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्या मंदिरमध्ये लायन्स क्लबच्या वतीने हेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
या आरोग्य तपासणी शिबीरात प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.शोएब मोमीन यांनी मुलांची आरोग्य तपासणी करत औषधोपचार केले.तसेच पावसाळ्यात मुलांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयी मौलिक मार्गदर्शन केले. इचलकरंजी लायन्स क्लबच्या वतीने हेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत महिन्यातून दोन वेळा शहर परिसरातील शाळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे.याच अनुषंगाने देशभक्त बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विद्या मंदिरमध्ये बालरोग तज्ञ डॉ.शोएब मोमीन यांनी मुलांची आरोग्य तपासणी केली.तसेच पावसाळ्यात मुलांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयी मौलिक मार्गदर्शन केले.प्रारंभी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर , सेक्रेटरी सुभाष तोष्णीवाल, खजिनदार संदिप सुतार , कमिटी चेअरमन नंदकुमार बांगड , मुख्याध्यापिका सुचिता आलमान यांच्यासह आरोग्य तपासणी शिबीराचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी १७२ मुलांची आरोग्य तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या हस्ते मुलांना माहिती पञक वाटप करण्यात आले.या शिबीरास लायन्स क्लबचे सदस्य सचिन येलाजा यांच्यासह शिक्षिका , कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा