You are currently viewing वेंगुर्ले येथे २७ सप्टेंबरला पर्यटन मेळाव्याचे आयोजन 

वेंगुर्ले येथे २७ सप्टेंबरला पर्यटन मेळाव्याचे आयोजन 

वेंगुर्ले :

 

वेंगुर्ले येथे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनी येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी “पर्यटन मेळावा” भव्य स्वरूपात आयोजित केला आहे. या मेळाव्यात केंद्र व राज्य शासनातील मंत्री, पर्यटन विभागाचे अधिकारी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन वेंगुर्ले येथील पत्रकार परिषदेत पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले.

यावेळी मोंडकर यांनी “सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा झाला असून या जिल्ह्यामध्ये अजून पर्यटन व्यवसाय वृद्धिगत करायचा असेल तर आम्हा सर्व पर्यटन व्यवसायिकांना एकसंघ होऊन संघर्षातून नाही तर समन्वयातून काम करायचे आहे, असेही सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टुरिझमला गतिमान करण्याचा महासंघाचा उद्देश आहे. म्हणून जागतिक पर्यटन दिनी म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६.३० या वेळेत जिल्हास्तरीय पर्यटन व्यवसायिक माध्यमातून पर्यटन व्यवसायिकांचे प्रश्न व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे ही पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा