नाव नोंदणीसाठी 30 सप्टेंबर पर्यंत आवाहन….

नाव नोंदणीसाठी 30 सप्टेंबर पर्यंत आवाहन….

 सिंधुदुर्गनगरी

जिल्हा कौशल्य व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सेवा सुविधा ऑनलाईन https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर देण्यात येणार आहे, अशी माहिती  जिल्हा कौशल्य व उद्योजकता विकासचे सहाय्यक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली.

            यामध्ये  रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे, पसंती क्रमांक मिळविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेतंर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग नोंदविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे, सहभाग घेणे, शैक्षणिक पात्रतेत वाढ करणे, पत्ता संपर्क क्रमांक, ई-मेल या मध्ये दुरुस्ती करण्यात करणे अशा  वेगवेगळ्या उद्योजकांनी अधिसुचित केलेल्या रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारांना अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यामध्ये समावेश आहे.

          उद्योजकांच्या मागणीनुसार उमेदवारांच्या याद्यामध्ये समावेश होण्यासाठी व विविध योजना मिळविण्यासाठी आपल्या नाव नोंदणीला (सेवा योजन कार्डला) प्रत्येक उमेदवाराने आपले आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे. तरी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (पूर्वीचे जिल्हा सेवायोजन कार्यालय)  येथे नोंदणी केलेल्या उमेदवारांनी अद्याप आधार कार्ड जोडले नाही अशा उमेदवारांनी आपले आधार कार्ड सत्वर जोडावे. वरील संकेत स्थळावर जावून जॉब सिकर (Job seeker) या ऑपशनमध्ये आपला युझर आयडी नोंदणी क्रमांक व स्वत:चा पासवर्ड टाकण्यात यावा. ऑन लाईन नोंदणी 30 सप्टेबर पर्यंत लिंग करण्यात यावी, अन्यत: आपली नोंदणी रद्द होणार आहे. अधिक  अधिक माहितीसाठी 02362-228835 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा