You are currently viewing कणकवलीत आप्पा जोशींचा पुतळा जाळला…

कणकवलीत आप्पा जोशींचा पुतळा जाळला…

राजापूरमधील ‘त्या’ वक्तव्याचा शिंदे गटाकडून निषेध

कणकवली

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात रिफायनरी विरोधक आप्पा जोशी नामक व्यक्तीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. शिवसेनेच्यावतीने आम्ही याचा निषेध करतो. यापुढे असे वक्तव्य केल्यास त्याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्यावतीने देण्यात आला. यावेळी आप्पा जोशी यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले.
श्री. पटोले यांच्या राजापूर दौऱ्यात रिफायनरी विरोधक श्री. जोशी यांनी श्री. सामंत यांना जाळून मारण्याच्या अनुषंगाने वक्तव्य केले होते. वक्तव्याचा माजी जि. प. सभापती संदेश पटेल यांनी निषेध केला. यावेळी सुनील पारकर, भूषण परुळेकर, शेखर राणे, दामू सावंत, बाळू पारकर, दिलीप घाडीगावकर व इतर उपस्थित होते.
उदय सामंत यांना अशी धमकी देण्याचे सोडा, पण वाकड्या नजरेने बघितले तरी योग्य उत्तर देऊ, असा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − six =