You are currently viewing शिरोडा वेळागर ९ हेक्टर क्षेत्र वगळण्या बाबत भूमिपुत्रांचे उपोषण

शिरोडा वेळागर ९ हेक्टर क्षेत्र वगळण्या बाबत भूमिपुत्रांचे उपोषण

शिरोडा वेळागर ९ हेक्टर क्षेत्र वगळण्या बाबत भूमिपुत्रांचे उपोषण

वेंगुर्ले

वेळागरवासीय भूमिपुत्रांची गावठाण क्षेत्रांतील गावठाण क्षेत्रांतील घेरे ,मांगर, संडास, बाथरूम, विहीरी व शेती बागायतीचे ९ हेक्टर जमिनीचे क्षेत्र शासन स्तरावरून बळजबरीने घेण्याचा प्रयत्न आमच्या संमतीविना होत असुन त्यास आम्हा अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. वास्तविक ताज प्रकल्पा साठी ६० एकर जागेची मागणी असतानाही आम्ही १२० एकर जमीन क्षेत्र दिलेले आहे व त्यास आमचा विरोध नाही.
मात्र आमची घरे दारे शेती बागायती असलेले ९ हेक्टर क्षेत्रही बळजबरीने व दहशतीने घेण्यास आमचा तीव्र विरोध आहे व त्याची शासन दरबारी नोंद आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उप सभापती श्री. मोरेश्वर टेभुडे व विधान परिषदेचे उपसभापती श्री. ना.सी. फरांदे या समितीनेही प्रत्यक्ष पाहणी करून हे गावठाण ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याची शिफारस केली आहे. तरी आम्हा अल्प भूधारक भुमिपुत्र शेतकरयांचे ९ हेक्टर क्षेत्र वगळण्यात यावे ही नम्र विनंती, त्यासाठी नाईलाजाने आम्ही दिनांक २६/१/२०२४ रोजी प्रजासत्ताक दिनी लाक्षणिक उपोषण करून शासनाने लक्ष वेधू इच्छितो याप्रश्नी तात्काळ लक्ष न दिल्यास आम्हास सर्व स्तरावर तीव्र आंदोलन व प्रसंगी आत्मसमर्पण करावे व त्याची जबाबदारी शासनावर राहील अशा आशयाचे पत्र शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटना शिरोडा वेळागरवाडी ता. वेंगुर्ला यांनी मुख्य सचिव मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांना सादर केले आहे.

राजेंद्र आदुंरलेकर अध्यक्ष,हनुमंत गवंडी सेक्रेटरी, जयप्रकाश चमणकर सल्लागार, गुणाजी (आजु) अमरे, आनंद अमरे, संजय आरोसकर, भानुदास गवंडी, विजय आरोसकर, श्रेयस केरकर, मनोज नाईक, उत्तर आरोसकर, संतोष आरोसकर, प्रविण आरोसकर, सिध्देश आदुंरलेकर, राजाराम उर्फ आबा चिपकर, रामचंद्र आरोसकर, वासुदेव आरोसकर, आदित्य गवंडी, महेंद्र गवंडी, बाळकृष्ण आरोसकर, विश्वनाथ आरोसकर, गजानन गवंडी, संतोष गवंडी, रामचंद्र आदुंरलेकर, प्रकाश गंवडी, गजानन मुडशी, चंद्रकांत नाईक, रुपेश गावंडे,ज्ञ
दत्ताराम आरोसकर (आबा) आदी शेतकरी उपोषणासाठी ऒरस येथे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + sixteen =