You are currently viewing खारेपाटणला आजपासून विज्ञान प्रदर्शन

खारेपाटणला आजपासून विज्ञान प्रदर्शन

कणकवली :

 

जिल्हा परिषद आणि कणकवली पंचायत समिती आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन खारेपाटण येथील विद्यालयात आजपासून सुरू होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्‍घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. मुस्ताक शेख, प्राथमिक शिक्षणधिकारी महेश धोत्रे, गटविकास अधिकारी मोहन भोई, सरपंच रमाकांत राऊत, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचा समारोप १३ सप्टेंबरला सायंकाळी होणार आहे. यावेळी स्पर्धा परीक्षेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा