You are currently viewing आंगणेवाडीतील जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी विजेता.

आंगणेवाडीतील जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी विजेता.

मसुरे :

आंगणेवाडी येथे कै. मामा कोरगावकर यांच्या स्मरणार्थ नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये समर्थ गवंडी याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेमध्ये 45 स्पर्धक सहभागी झाले होते. सहभागी सर्व स्पर्धकांना मामा कोरगावकर यांच्या स्मरणार्थ स्मृती चषक देण्यात आला.
स्पर्धेमधील द्वितीय क्रमांक मृणाल सावंत आणि ईशा गोडकर यांना विभागून, तृतीय क्रमांक स्नेहल करंबळेकर आणि पवित्रा उपरकर यांना विभागून, चतुर्थ क्रमांक नेहा जाधव तर उत्तेजनार्थ साक्षी नाईक, भक्ती जामसंडेकर आणि विश्लेषा मांडलिक यांची निवड करण्यात आली विजयी सर्व स्पर्धकांना रोख रकमेची बक्षिसे आणि मामा कोरगावकर स्मृती चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण प्रसिद्ध नृत्यांगना सिद्धी आंगणे आणि शामली महाडेश्वर यांनी केले. बक्षीस वितरण समारंभ सामाजिक कार्यकर्ते नितीन कोरगावकर, उद्योजक सचिन कोरगावकर, राजा कोरगावकर निलेश महाडेश्वर, संभाजी तोरसकर, चंद्रशेखर आंगणे, पप्पू तोरसकर, साईराज कोरगावकर, शिवम महाडेश्वर, प्रतीक आंगणे, प्रथमेश आंगणे, सुभाष आंगणे, गणेश आंगणे, प्रसाद आंगणे, तूशार आंगणे, ओमकार आंगणे, संतोष आंगणे, जयेश आंगणे, सतीश आंगणे, सत्यविजय आंगणे, पंकज आंगणे सचिन आंगणे, काका आंगणे, नंदू आंगणे, तनुराज आंगणे, समीर आंगणे, बाळा आंगणे आणि कोरगावकर परिवार, आंगणे ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी केले. सर्व स्पर्धकांना रोख रखमेची बक्षीसे आणि कै. मामा कोरगावकर चषक देण्यात आलेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two − 1 =