You are currently viewing भक्षाच्या शोधार्थ बिबट्या मानवी वस्तीत

भक्षाच्या शोधार्थ बिबट्या मानवी वस्तीत

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

 

सावंतवाडी (न्हावेली) :

 

न्हावेली-नागझरवाडी येथील शेतकरी रुपेश सावंत यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यास वनविभागाला यश आले. आज सकाळी ९:०० वा. ही घटना घडली. त्या बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. याबाबतची माहिती सावंतवाडी वन विभागाचे अधिकार मदन क्षिरसागर यांनी दिली. दरम्यान तो बिबट्या कोंबडी किंवा भटक्या कुत्र्याच्या शिकारीसाठी त्या ठिकाणी आला असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तर मोठ्या प्रमाणात पाऊस असताना सुद्धा बचाव पथकाने यशस्वीरीत्या त्याला जेरबंद केले.

वनविभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. हा बिबट्या अंदाजे अडीच ते तीन वर्षाचा वाढलेला नर असून त्याची वन्यजीव वैद्यकीय डॉक्टर यांच्याकडून तपासणी करण्यात आली. पूर्णतः निरोगी असल्याचे तपासणीमध्ये दिसून आल्यावर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. कार्यात न्हावेलीच्या गावकरी मंडळींसोबतच उपवनरक्षक सावंतवाडी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर, कडावल वनक्षेत्रपाल अमित कटके, वनपाल महेश पाटील, वनरक्षक अप्पोसा राठोड, दत्तात्रय शिंदे, महादेव गेजगे, संग्राम पाटील, सागर भोजने, प्रकाश रानगिरे, रामदास जंगले, राहुल मयेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − one =