You are currently viewing ६ फेब्रुवारी रोजी ४८ खेड्यांचे दैवत श्री देव महालक्ष्मी श्री स्थापेश्र्वर डेगवे येथील जत्रोत्सव होणार साजरा

६ फेब्रुवारी रोजी ४८ खेड्यांचे दैवत श्री देव महालक्ष्मी श्री स्थापेश्र्वर डेगवे येथील जत्रोत्सव होणार साजरा

बांदा :

 

दरवर्षीप्रमाणे डेगवे येथील ४८ खेड्यांचे दैवत असलेल्या श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार ६ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी श्रींची पूजा – अर्चा आदी धार्मिक विधी होऊन सकाळी ८ वाजल्यापासून देवदर्शन, ओटी भरणे, नवस फेडणे, नवस बोलणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच रात्री ११.३० वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात प्रारंभ होणार असून त्यानंतर देवेंद्र नाईक संचलित चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा ‘पातिव्रत्य तेज’ हा नाट्य प्रयोग सादर होईल. भाविकांनी तसेच नाट्य रसिकांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट डेगवेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − seventeen =