You are currently viewing वामनाश्रम स्वामींकडून जानवली नदीपात्रात गंगापूजन

वामनाश्रम स्वामींकडून जानवली नदीपात्रात गंगापूजन

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले वामनाश्रम स्वामींचे दर्शन

19 व्या चातुर्मास सोहळ्याची गंगापूजनाने सांगता

कणकवली

श्री, श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या 19 व्या चातुर्मास सोहळ्याची आज कणकवलीत गणपती साना येथे गंगापूजनाने सांगता झाली. कणकवली गणपती साना येथे आणलेल्या विशेष बोटी मधून वामनाश्रम स्वामी यांनी जानवली नदीपात्रात जात गंगा पूजन केले. त्यानंतर सजवलेल्या रथातून वामनाश्रम स्वामी यांची कणकवली बाजारपेठेतून सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे देखील या मिरवणुकीत जातीनिशी सहभागी झाले होते. त्यांनी देखील वामनाश्रम स्वामींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्या सह अन्य भागातूनही वैश्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सकाळच्या सत्रात नारळ गण होम करण्यात आला व त्यानंतर गण होम पूर्णहुती करण्यात आली. विविध कार्यक्रमानी हा चातुर्मास सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + 20 =