You are currently viewing तालुक्यातील अवैध धद्यांना  आळा बसण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घ्यावी – शहराध्यक्ष आशिष सुभेदार

तालुक्यातील अवैध धद्यांना  आळा बसण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घ्यावी – शहराध्यक्ष आशिष सुभेदार

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील अवैध धद्यांना आळा बसण्यासाठी पोलिस प्रशासनाने धडक कारवाईची मोहीम हाती घ्यावी. तसेच तालुक्यात कायदा वं सुव्यवस्था राहण्याकरिता प्रयत्न केले जावेत याच बरोबर सोनुर्ली श्री माऊली देवस्थान चोरी प्रकरणी अद्याप मोकाट असलेल्या चोरट्याना लवकरात लवकर गजाआड केले जावे अशी मागणी सावंतवाडीचे नूतन पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे सावंतवाडी शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी शहर मनसेच्या वतीने शहराध्यक्ष आशिष सुभेदार वं पदाधिकारी यांनी मेंगडे यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची सावंतवाडी शहर मनसेच्या वतीने भेट घेण्यात आली. यावेळी पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, आरोस विभाग अध्यक्ष मंदार नाईक, सचिव कौस्तुभ नाईक, मनविसे तालुकाध्यक्ष ओंकार कुडतरकर, मुकुंद धारगळकर, प्रवीण गवस, सर्वेश तेली, आदित्य कुडतरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आशिष सुभेदार यांनी तालुक्यातील तेजीत असलेल्या अवैध धंदयावर कडक करावाई पोलिस प्रशासनाकडून केली जावी.

शहरात सध्या चोऱ्या घरफोड्याचे प्रमाण वाढले आहे त्या दृष्टीने रात्रीच्या वेळी पोलिसांच्या गस्ती पथकात वाढ केली जावी. सोनुर्ली येथील श्री देवी माऊली मंदिरात चोरी होऊन सोळा दिवस पूर्ण होत आले तरी चोरीचा छडा लागलेला नाही. चोरी करणारे चोरटे अद्याप मोकाट फिरत आहेत त्यांना तातडीने अटक केले जावे. या मंदिरात चोरी होणे म्हणजे असंख्य भाविकांच्या भावनेला ठेच पोहचवण्यासारखे आहे त्यामुळे पोलिस प्रशांसनाने या गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करावा अशी मागणी केली. यावर पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी तालुक्यातील अवैध धंदा्यांना आवर घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जावे. सोनूर्ली माऊली मंदिर चोरी प्रकरणी तपास सुरु आहे. शहरात रात्रीच्या वेळी चार पोलिसांचे गस्ती पथक तैनात करण्यात आली आहेत असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − four =