You are currently viewing सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सिंधूपुत्र श्री सत्यवान यशवंत रेडकर यांचा सत्कार

सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे सिंधूपुत्र श्री सत्यवान यशवंत रेडकर यांचा सत्कार

सिंधुदुर्ग

गाव खेड्यातील शालेय विधार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सेवेत येण्याचा ध्यास घेतलेले व त्यासाठी स्वतःचे तन- मन -धन व महत्वाचं वेळ खर्चून आवश्यक असलेलं मार्गदर्शन मोफत देणारे तिमिरातुनी तेजाकडे या संस्थेचे संस्थापक श्री सत्यवान रेडकर सर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांनी आज सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयास भेट दिली.

सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे श्री नंदकिशोर काळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी श्री. सत्यवान रेडकर सर यांना कार्यालयातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांच्याकडून होत असलेल्या शैक्षणिक चळवळीच्या अनुषंगाने सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यालयातील चैतन्य बकरे, अरुण पाटील, प्रवीण सातारे, अमित पाटील व अमित नायकवडी हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तसेच श्री सुनील खंदारे, कालिदास झणझणे व राधा बसनकर हे लिपकवर्गीय कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा