You are currently viewing माडखोल उत्कर्ष ग्रुप आयोजित ऑनलाइन गणेश-सजावट स्पर्धा 2022 बक्षीस वितरण सोहळा संपन्न

माडखोल उत्कर्ष ग्रुप आयोजित ऑनलाइन गणेश-सजावट स्पर्धा 2022 बक्षीस वितरण सोहळा संपन्न

सावंतवाडी

माडखोल उत्कर्ष ग्रुप आयोजित ऑनलाइन गणेश-सजावट स्पर्धा 2022 वर्ष 2 रे,  बक्षिस वितरण सोहळा ग्रामदैवत श्री देवी पावणाई मंदिरात संपन्न झाला प्रथम पारितोषिक- अनंतराव देसाई ( बेबीवाडी) माजी सरपंच राजन राऊळ पुरस्कृत 3111 रूपये द्वितीय पारितोषिक जीजी धुरी / विश्राम आडेलकर माजी सरपंच संजय राऊळ पुरस्कृत 2111 रूपये तृतीय पारितोषिक- मधुकर राऊळ/ कृष्णा पालव सोसायटी चेअरमन जिजी राऊळ पुरस्कृत 1511 रूपये उत्तेजनार्थ– गुरूनाथ राऊळ/ ज्ञानेश्वर लाड सनातन संस्थेचे साधक जिवन केसरकर पुरस्कृत 1001 रूपये देण्यात आले.

या बक्षिस वितरण सोहळ्यास देवस्थान मानकरी दत्ताराम ( भाई) राउळ , शंकर राउळ, बापू राऊळ, माजी सरपंच राजन राऊळ, संजय राऊळ , सूर्यकांत राऊळ, विद्यमान सरपंच संजय शिरसाठ, सोसायटी चेअरमन जिजी राऊळ, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मसाजी राऊळ तंटामुक्ति अध्यक्ष जगन्नाथ परब माजी ऊपसरपंच सुरेश आडेलकर सहदेव राऊळ , जयवंत राऊळ, सुयोग राऊळ, संजय देसाई, मेघनाथ पालव, लक्ष्मण बरागडे( माजी पोलीस पाटिल) रमाकांत राऊळ, भिवा राऊळ आदि ग्रामस्थ उपस्थित होते या स्पर्धेदरम्यान माडखोल उत्कर्ष ग्रुप च्या वतिने गावातील निराधार युवती कु सुप्रिया राऊळ हिच्या भवितव्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते,  त्याला उदंड प्रतिसाद मिळून रोख रक्कम 37000 रूपये जमा झाले.  ते तिच्याकडे सुपुर्द करण्यात आले तसेच माडखोल धुरीवाडितील जि प आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सन्मानिय श्री दत्ताराम सावंत यांचा माडखोल गाव च्या वतिने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला   तसेच या कार्यक्रमानिमित्त माडखोल गावातील भारतीय सैन्य सेवेत कार्यरत असणार्या सैनिकांचा माजी सैनिक संघटनेच्या वतिने गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश आडेलकर सुत्रसंचालन लखन आडेलकर आभार प्रर्दशन प्रमोद राऊळ यांनी केले

प्रतिक्रिया व्यक्त करा