You are currently viewing ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने गडगेवाडी येथे बांदा दोडामार्ग रस्ता पाण्याखाली

ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने गडगेवाडी येथे बांदा दोडामार्ग रस्ता पाण्याखाली

सावंतवाडी :

 

बांदा शहर व परिसराला आज सायंकाळी उशिरा ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने झोडपून काढले. सलग २ तास पाऊस कोसळल्याने शहरातील सर्वच रस्ते जलमय झाले होते. शहरात गटाराचे पाणी तुंबल्याने गडगेवाडी येथे बांदा दोडामार्ग रस्ता पाण्याखाली गेला होता. येथील वाहतूक तब्बल अर्धा तास बंद होती.

आज सायंकाळी पावसाने कहर केला. सलगपणे मुसळधार पाऊस कोसळल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील सर्वच रस्ते जलमय झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वीज पुरवठा खंडित झाला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − seven =