You are currently viewing देशातील सर्वात तरुण महापौर!!

देशातील सर्वात तरुण महापौर!!

BSc च्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी 21 वर्षीय आर्या राजेंद्रन ने तब्बल 23 वर्षानंतर फडणवीस यांचा विक्रम मोडला..

आर्या राजेंद्रन भारतातील सर्वात तरुण महापौर होणार आहे. ती सध्या ऑल सेंटस कॉलेजमध्ये बीएस्सी मॅथ्सचे शिक्षण घेत आहे. आर्या राजेंद्रन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणुकीत विजयी झाली असून ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाची राज्य कार्यकारिणीची सदस्य देखील आहे.

केरळमध्ये नुकत्याच महापालिका आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीमध्ये तिरुवनंतपुरम महापालिकेत मुडवणमुगल वार्डातून आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी विजयी झाली आहे. ती आता तिरुवनंतपुरम महापालिकेची महापौर होणार आहे. आर्या राजेंद्रननं महापौर पदाची शपथ घेतल्यानंतर ती महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम मोडणार आहे. देवेंद्र फडणवीस वयाच्या 27 व्या वर्षी महापौर झाले होते. देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आहे.

आर्या राजेंद्रन सीपीएमच्या ब्रँच कमिटी सदस्य असून बालाजनसंघम प्रदेशाची अध्यक्ष आहे. आर्याचे वडील इलेक्ट्रिशीयनचे काम करत असून आई श्रीलथा एलआयसी एजंट म्हणून काम करते.

केरळमधील स्थानिक निवडणुकांमध्ये 941 ग्रामपंचायत आणि 14 जिल्हा परिषदांमध्ये सत्तारुढ डाव्या आघाडीनं मोठा विजय मिळवला आहे. 10 जिल्हा परिष, 152 पंचायत समित्यांमध्ये सीपीएमच्या नेतृत्वातील एलडीएपला विजय मिळवला आहे. तर भाजपनं 23 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे.

आज पर्यंत देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा विक्रम महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे. तर, आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय असून केरळची राजधानी असलेल्या तिरुवनंतपुरमची महापौर होणार आहे. तब्बल 23 वर्षानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरील रेकॉर्ड मोडले जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 3 =