You are currently viewing पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यानंतर बंदर विभागाचा जलक्रीडा व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा…

पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यानंतर बंदर विभागाचा जलक्रीडा व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा…

सर्व्हे प्रमाणपत्र व इतर कागदपत्र नसलेल्या व्यवसायिकांवर कारवाई…

मालवण 

नवीन पर्यटन हंगामास सुरुवात झाल्यावर बंदर विभागाने सर्व्हे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे नसणाऱ्या जलक्रीडा व्यवसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला असून आजही एका जलक्रीडा व्यवसायिकावर कागदपत्रे नसल्याप्रकरणी १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. कागदपत्रे नसल्याप्रकरणी गेल्या काही दिवसातील ही चौथी कारवाई ठरली आहे. कागदपत्र नसणाऱ्या जलक्रीडा व्यवसायिकांवर कारवाई सुरूच राहणार अशी माहिती मालवण बंदर निरीक्षक रजनीकांत पाटील यांनी दिली आहे।

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + two =