You are currently viewing पावसाचे पाणी नांदगाव परिसरातील घरांमध्ये; नांदगाव वासियांनी महामार्ग धरला रोखून!

पावसाचे पाणी नांदगाव परिसरातील घरांमध्ये; नांदगाव वासियांनी महामार्ग धरला रोखून!

पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांची घटनास्थळी धाव

कणकवली

कणकवली तालुक्‍यात सुमारे तीन तास मुसळधार पाऊस सुरू आहे. यात महामार्गालगत पुरेशी गटार व्यवस्था न केल्‍याने पावसाचे पाणी नांदगाव परिसरातील घरांमध्ये गेले आहे. त्‍यामुळे संतप्त झालेल्‍या नागरिकांनी एकत्र येऊन महामार्ग रोको आंदोलन सुरू केले. दरम्यान यानंतर काही वेळातच पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्ग वाहतूकिस खुला केला.
महामार्ग चौपदरीकरण करताना महामार्ग ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने गटारांचे बांधकाम केले. त्‍यामुळे गेली दोन वर्षे पावसाळ्यात नांदगाव परिसरातील घरांमध्ये पावसाने पाणी जाऊन नुकसान होत आहे. याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते नागेश मोरये यांनी यंदाच्या स्वातंत्र्यदिनी उपोषण केले होते. त्‍यावेळी महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंत्‍यांनी येथील पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याची ग्‍वाही दिली होती. मात्र ठेकेदाराकडून प्रत्‍यक्षात काम झाले नाही. आज होत असलेल्‍या मुसळधार पावसाचा फटका येथील घरांना बसला आहे. घरांमध्ये पाणी गेल्‍याने येथील नागरिकांनी एकत्र येऊन महामार्ग रोको आंदोलन सुरू केले. परंतु पोलीस निरीक्षकांच्या मध्यस्थीने आंदोलन काही मिनिटातच मागे घेण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 13 =