मुलीच्या साखरपुड्याच्या आदल्या दिवशी पित्यावर काळाचा घाला

मुलीच्या साखरपुड्याच्या आदल्या दिवशी पित्यावर काळाचा घाला

कोलगाव येथील दुर्दैवी घटनेने हळहळ

सावंतवाडी

मुलीच्या साखरपुड्याच्या आदल्याच दिवशी वडिलांचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना कोलगाव येथे घडली आहे. कोलगाव येथील रहिवासी नंदू राऊळ ( वय ६२) यांचे त्यांच्या राहत्या घरी आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मुलीचे २ मे रोजी लग्न ठरले होते. परंतु साखरपुड्याचा आदल्याच दिवशी नियतीने पित्याला हिरावून नेल्याने कोलगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गेले पंचवीस वर्ष ते सावंतवाडी येथील प्रसिद्ध बाळकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस येथे काम करत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा