You are currently viewing वैभववाडीत सेल्फी पॉईंटचे नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

वैभववाडीत सेल्फी पॉईंटचे नितेश राणेंच्या हस्ते उद्घाटन

वैभववाडी

शहरातील छत्रपती संभाजी चौकात उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉइंटचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडले. वैभववाडीकरांसाठी दिलेल्या वचनाची आ.राणे यांनी पूर्तता केली. उद्घाटन सोहळा पार पडताच आमदार नितेश राणे यांच्या सोबत सेल्फी व फोटो काढण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती.

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून येथील संभाजी चौकात सेल्फी पॉईंट उभारण्यात आलेला आहे.याच मंगळवारी रात्री उद्घाटन झाले. आ.राणे यांनी फित कापून त्याच उद्घाटन केले. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी सभापती भालचंद्र साठे, अरविंद रावराणे विषय समिती सभापती बबलू रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे नगरसेवक डॉ. राजेंद्र पाताडे, बंड्या मांजरेकर, व्यापारी मंडळ अध्यक्ष रत्नाकर कदम, नगरसेविका रेवा बावदाने, यामिनी वळवी, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, नगरसेवक राजन तांबे, रज्जब रमदूल, पोलीस निरीक्षक अमित यादव, नगरपंचायतचे मुख्याधिकारी सुरज कुमार कांबळे, उदय पांचाळ, अक्षय पाटील, प्रदीप नारकर व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व वाभवे- वैभववाडी नगरपंचायतीच्या माध्यमातून येथील संभाजी चौकात सेल्फी पॉईंट उभारण्यात आलेला आहे. तरुणाईसाठी आकर्षण असणाऱ्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेण्यासाठी युवावर्गाची गर्दी झाली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 15 =